पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात आज बुधवारी सकाळी मौनी अमावस्याच्या निमित्ताने त्रिवेणी संगमावर ‘ अमृत स्नान ‘ साठी मोठ्या प्रमाणावर भावीकांनी गर्दी केली होती .दरम्यान प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.आज सकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल १.७५ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले आहे. दरम्यान उत्तरप्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार २८ जानेवारी पर्यंत प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात एकूण. १९ .९४ कोटी लोकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला आहे.