पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणावर महाकुंभ मेळावा भरला असून आज बुधवारी सकाळी अमृत स्नानासाठी गेलेल्या भाविका मध्ये मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली आहे यात १० भाविकांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे तर अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. दरम्यान या चेंगराचेंगरीचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओ मध्ये चेंगराचेंगरी नंतर अनेक भाविकांचे सामन मोठ्या प्रमाणावर विखुरलेल्या स्वरुपात दिसत आहे तर त्यांच्यात आपापसात ताटातूट झाली आहे.यात काही भाविक बेशुद्ध पडले आहेत.तर काही लोक भाविकांना सीपीआर देताना दिसत आहेत.तर काही भाविक जखमी झाल्यांने रडताना दिसत आहेत.दरम्यान या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या भाविकांचा अधिकृत आकडेवारी प्रशासना च्या वतीने जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अशा स्थितीत आपले नातेवाईक या गर्दीत हारवू नये म्हणून भाविकांनी कपड्यांची दोरी बनवून त्याचा वापर करत आहेत.या कपड्यांच्या दोरीच्या सहाय्याने सर्वजण गर्दी मधून मार्गक्रमण करत आहेत. दरम्यान या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचे नागरिक मोठ्या प्रमाणावर गंभीर रित्या जखमी झाले आहेत. दरम्यान आज सकाळी अमृत स्नानाच्या वेळेस ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.