Home Breaking News पालकमंत्री अजित पवार प्रथमच बीडमध्ये, चुकीचे काम केल्यावर मकोका लावणार आतातरी सुधरा?

पालकमंत्री अजित पवार प्रथमच बीडमध्ये, चुकीचे काम केल्यावर मकोका लावणार आतातरी सुधरा?

45
0

पुणे दिनांक ३० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता सकाळीच एक खळबळजनक अपडेट ही बीड मधून येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच आज गुरुवारी बीडच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी कॅबिनेट धनंजय मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अजित पवार यांचे स्वागत केले.दरम्यान आज सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.दरम्यान या बैठकीत धनंजय मुंडे व आमदार सुरेश धस तसेच कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे व इतर आमदार तसेच इतर पक्षांचे कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत.दरम्यान या बैठकीत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी देखील चर्चा होईल का? तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्या होईल का? हे पाहाणे म्हत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड मध्ये दाखल झाले असून त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.व आपल्या रोखठोक शैलीत देखील सुनावले आहे.तालुक्यात व जिल्ह्यात विकास कामे करताना कोणत्याही प्रकारचे खंडणीचे प्रकार करणार नाही.कार्यकर्त्यांनी चुकीचे काम केल्यावर त्यांना मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही.जे कमरेला रिव्हाॅलवर लावून फिरतील त्यांचा रिव्हाॅलवरचा परवाना तातडीने रद्द करण्यास जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना सांगणार  तसेच मोबाईलवर रिल केल्यानंतर मी खपवून घेणार नाही.चारित्र स्वच्छ ठेवा.तसेच आपल्या बरोबर चुकीचे माणसे आजुबाजुला ठेवू नका.तसेच तथ्य असल्यास तिथे संबंधितांवर तातडीने कारवाई करणार असा ढोसच पालकमंत्री अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे समोर अनेकांना दिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Previous articleपुण्यात उपचारा दरम्यान जीबीएस महिला रुग्णाचा मृत्यू, पुण्यात रुग्णांची संख्या १२७ पार
Next articleविमानाची व हेलिकॉप्टरची हवेतच भीषण धडक,६० प्रवासी असलेले विमान क्रॅश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here