पुणे दिनांक ३० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरुन पुरंदरचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.तर मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके व दौंड विधानसभा मतदारसंघा चे भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.दरम्यान पुण्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत.दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांची वर्णी न लागल्यामुळे पुणे जिल्ह्यातील शिंदे गटाचे शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत.