पुणे दिनांक ३० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथे सकाळी कामावर जाणाऱ्या पुणेकर नागरिकांची ट्रॅफिकमुळे रोजच डोकेदुखी होत आहे.या वाहतूक कोंडीला पुणेकर नागरिक चांगलेच त्रासले आहेत. दरम्यान अशा ट्रॅफिक कोंडीचा आता सोशल मीडियावर भयंकर ट्रॅफिक कोंडीचा एक व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान सदरचा व्हिडिओ हा सिंहगड रोड वरील राजाराम पुल येथील भागातील आहे.दरम्यान या व्हिडिओ मध्ये जेथे नजर जाईल तिथपर्यंत फक्त ट्रॅफिकचे चित्र दिसत आहे. दरम्यान यात या भागातील नागरिकांना सकाळी ऑफिसला जाताना व सायंकाळी घरी परतताना रोजच याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सदरचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीने यात म्हटले आहे.दरम्यान पुण्यातील वाहतूकीचा प्रश्न कधी सुटणार? असा गंभीर प्रश्न येथील लाखो नागरिकांना पडला आहे.दरम्यान पुण्याचे पालकमंत्री याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न देखील नागरिक करत आहेत.