पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातूनच खळबळजनक अपडेट आली असून.पुणे शहरात जी बी सिंड्रोम या साथीच्या आजारांने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या आजाराचा हा पुण्यातील पहिला रुग्ण आहे.दरम्यान ही महिला सिंहगड रोड परिसरात राहत असल्याची माहिती मिळत आहे.या आधी सिंहगड रोड येथील एका सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला आहे.दरम्यान या आजाराचे पुण्यात रुग्ण झपाट्याने वाढत असून आज अखेर या रुग्णांची पुण्यातील संख्या ही १२७ च्या पुढे गेली आहे.
दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पुण्यातील विशेष सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान सिंहगड रोड वरील धायरी. तसेच किरकिटवाडी . नांदेड सिटी.या भागात या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.तर पुणे महापालिकेच्या वतीने जी बी एस झोन म्हणून सिंहगड रोड परिसर घोषित केला आहे.दरम्यान पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सदरचा आजार टाळण्या साठी प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे.यात प्रामुख्याने १) घरातील पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी.व पाणी उकळून व नंतर थंड करून प्यावे २) तसेच घरातील अन्न स्वच्छ व ताजे असावे ३) शिजलेले अन्न व न शिजलेले अन्न एकत्रित रित्या न ठेवल्यास देखील संसर्ग टाळता येईल ४) जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्या नंतर साबणाने व पाण्याने हात ✋ स्वच्छ धुवावेत ५) अन्न पदार्थ हाताळताना प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत.६) पुणे महापालिकेच्या वतीने मेडीक्लोर च्या बाटल्यांचे वाटप केले जात असून पाण्याच्या शुद्धीकरणासाठी नागरिकांनी त्याचा वापर करावा असे पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.