पुणे दिनांक ३० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट बीड जिल्ह्यातून आली असून.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज गुरुवारी बीडच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे .दरम्यान बीड जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित व भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांना वगळले आहे.दरम्यान बीड जिल्ह्यातील सर्व घोटाळा प्रकरण बाहेर काढणे तसेच धनंजय मुंडे यांच्यावर प्रहार करणे हे आमदार सुरेश धस यांना महाग पडले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वपक्षीय पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा बीड मधील प्रकरणां वरुन राजीनामा मागणे यांना महाग पडले अशी बीड मधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे.