पुणे दिनांक ३१ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक सकाळीच अपडेट क्रिकेट 🏏 विश्वातून आली असून.आज शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना सायंकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे.दरम्यान या सामन्याचा आनंद आज पुणेकर क्रिकेट चाहत्यांना घेता येणार आहे.दरम्यान आज पुण्यातील स्टेडियमवर चौकार व षटकारची बरसात पुणेकरांना पाहण्याची शक्यता आहे.दरम्यान या मालिकेत एकूण ५ टी -२० सामना खेळले जाणारे असून यातील दोन सामने भारताने जिंकले असून एक सामना इंग्लंड संघाने जिंकला आहे.तर आज चौथा सामना पुण्यातील स्टेडियमवर होत आहे.तर पाचवा सामना हा मुंबई मधील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत रोमांच आहे.
दरम्यान आज पुण्यातील स्टेडियमवर होणा-या आजच्या सामन्यात आज रिंकू सिंह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.तो चांगलाच फिट झालेला आहे.त्यामुळे आज ध्रुव जुरेलला बाहेर केले जाण्याची शक्यता आहे.तर मोहम्मद शमी व अर्शदीप सिंग या दोघांना देखील पुण्यातील मौदानवार उतरवले जाईल. असा अंदाज आहे.दरम्यान पुण्यातील स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीकडे सर्वच क्रिकेट प्रेमीचे लक्ष लागले आहे. दरम्यान हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल.तसेच पुण्यातील या सामन्याचे तिकीट यापूर्वीच फुल्ल झाले आहेत.