पुणे दिनांक १ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरात सिंहगड रोड वरील भागात गुलियन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत आहे.जवळपास पुणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णांनाची संख्या आहे. यात आतापर्यंत या आजाराने चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान दुषित पाण्यामुळे या आजाराचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे.असे आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांचे मत आहे.दरम्यान पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात अनेक शहराजवळील उपनगर हे समाविष्ट करण्यात आले आहे.परंतू या भागात पुणे महानगरपालिकेच्या वतीने या भागातून मोठ्या प्रमाणावर कर गोळा केला जातो व या भागात नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्यात तसेच मुख्य म्हणजे या भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा महानगरपालिकेला अपयश आले आहे.त्या मुळे सिंहगड रोड वरील धायरी तसेच न-हे या भागात टॅंकरद्वारे दुषित पाणी पुरवठा केला जातो.तसेच या भागात टॅंकर लाॅबी मोठ्या प्रमाणावर आहे.परिणामी या दुषित पाण्यामुळे या भागातील नागरिकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे.त्यातच जीबीएस चे रुग्ण या या भागात जास्त आहे.व या भागातील नागरिकांचा मृत्यूला पुणे महानगरपालिकाच जबाबदार आहे.या भागातील जीबीएस च्या रुग्णांवर पुणे महानगरपालिकेने रुग्णालयात उपचाराची जबाबदारी घ्यावी.दरम्यान पुण्यात खासगी ट्रॅक्टरने वाटप होणा-या एकूण १५ केंद्रावर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान या केंद्रांना नोटीस देखील बजावण्यात आल्या.