पुणे दिनांक २ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट अहिल्यानगर येथून आली आहे.अहिल्यानगर येथे आज थोड्याच वेळापूर्वी झालेल्या ६७ व्या महाकेसरी स्पर्धा मध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांनी सोलापूरचा पहिलवान महेंद्र गायकवाड यांचा पराभव केला आहे. दरम्यान यावेळी महेंद्र गायकवाड यांने मैदान सोडले नंतर पंचांनी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी घोषित केले.दरम्यान राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळ याला चांदीची गदा तसेच थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.पृथ्वीराज यांच्या विजयानंतर त्यांच्या पुण्यातील समर्थकांकडून खांद्यावर घेऊन मैदानावर एकच जल्लोष केला आहे.दरम्यान महाराष्ट्र केसरी ६७ वा पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. दरम्यान आज अहिल्यानगर येथील कुस्तीच्या मैदानावर गोंधळ मोठ्या प्रमाणावर झाला आहे.