पुणे दिनांक २ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून.माजी मुख्यमंत्री व महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे एकूण २० ते २५ आमदार यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच कंट्रोल आहे.दरम्यान मागील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकार मधील शिवसेना आमदार त्यांच्या विरोधात बंड करुन देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले म्हणून ते आमदार गुवाहाटी ला गेले होते.असा आता खळबळजनक दावा उध्दव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता राहिलेल्या आमदारांमध्ये देखील चलबिचल सुरू आहे.भविष्यात आपली कोंडी होण्याची भिती त्यांना आहे.दरम्यान २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील तुम्हीच मुख्यमंत्री असा शब्द असा शब्द भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता.पण तो शब्द पाळला गेला नाही. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहेत.असे देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.