देवदर्शन घेऊन खासगी प्रवासी ट्राॅव्हल्सने परतणाऱ्या भाविकांची बस नाशिक – सुरत महामार्गावरील दरीत कोसळली ७ जणांचा घटनास्थळीच मृत्यू तर १५ जण गंभीर रित्या जखमी
पुणे दिनांक २ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.देवदर्शन करुन खासगी ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणाऱ्या २०० प्रवासी असलेली बस नाशिक ते सुरत महामार्गावर आज रविवारी पहाटेच्या सुमारास सापुतारा येथील २०० फुट खोल खोल दरीत कोसळली आहे.या झालेल्या भीषण अपघातात ७ प्रवासी हे घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर एकूण १५ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.आज रविवारी पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस मधील भाविकांनी नाशिक येथे देवदर्शन घेऊन गुजरातच्या दिशेने जात असताना बसला भीषण आग अपघात झाला आहे.ही बस २०० फुट खोल दरीत साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोसळली आहे.या अपघातात बसचे चक्क मधोमध दोन तुकडे झाले आहे.दरम्यान यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.यातील सर्व मृत व जखमी भाविक हे मध्ये प्रदेश मधील आहेत.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.