पुणे दिनांक २ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम जीबीएसने धुमाकूळ घातला आहे.त्यांचे थैमान थांबता थांबत नाही.मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.तरी रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. वाढ मात्र मोठ्या प्रमाणावर होत आहे.यात या विषेश म्हणजे फक्त रुग्णांची संख्या वाढत नसून ते रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत आहे.दरम्यान शनिवारी नवीन तीन रुग्णांची नवीन भर यात पडली आहे. त्यामुळे या रुग्णांची संख्या आता १४९ वर पोहोचली आहे.तर व्हेंटिलेटरवर तब्बल २८ रुग्ण आहेत.तर आजपर्यंत एकूण ५ मृत रुग्णांची संख्या आहे.
दरम्यान पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या ही १४९ वर पोहोचली आहे.यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत २९ रुग्ण आहेत.तर पुणे जिल्ह्यात ८ रुग्ण आहेत. तर यातील २८ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.दरम्यान शनिवारी व्हेंटिलेटरवरच्या रुग्णांची संख्या ही १८ होती पण ती संख्या आता २८ झाली आहे.यात १० रुग्णांची संख्या १० ने एकदम वाढली आहे.अशी माहिती पुणे आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.पुणे व पिंपरी चिंचवड तसेच पुणे ग्रामीण येथील जीबीएस रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विषेश लक्ष दिले जात आहे.तरी रुग्णांनी घाबरून जाऊ नये.आरोग्य विभागाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहे.नागरिकांनी पाणी उकळून प्यावे.तसेच अर्धवट शिजवलेले मांस खाणे टाळावे.असे आवाहन राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.