पुणे दिनांक २ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून खळबळजनक अपडेट आली असून.बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत हे आता चांगलेच आक्रमक झाले असून.त्यांनी बीड जिल्ह्यातील १८३ शस्त्र परवाने त्यांनी रद्द केली आहेत.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या नंतर पोलिसांनी 👮 धडक कारवाई केली आहे.दरम्यान बीड जिल्हात मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने असून अनेक जण हे पिस्तूल कमरेला लावून फिरतात व गावात दहशत निर्माण करतात अशा लोकांचे आणखी १२७ शस्त्र परवाने रद्द करण्यात येणार आहेत.तसेच बीड मध्ये ८ जणांनी 👮 पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आले आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच सर्वाधिक शस्त्र परवाने बीड जिल्ह्यात खिरापत सारखे वाटप करण्यात आले आहे.