पुणे दिनांक २ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आताच थोड्या वेळापूर्वी चांगलाच गोंधळ झाला आहे.आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नांदेडचा डबल केसरी गादी स्पर्धा मध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांनी पराभव केला.यावर राक्षेंनी यातील पंचाना लाथ मारली त्यांचे म्हणणे होते की या गादी स्पर्धा मध्ये माझे खांदे खाली न टेकता यातील पंचानी मोहोळला विजयी घोषित केल्यामुळे येथे चांगलाच गोंधळ उडाला आहे. यावेळी पुण्याचे पहिलवान पृथ्वीराज यांने शिवराज याला उचलून खाली टाकले यावेळी पंचांनी पृथ्वीराज याला विजयी घोषित केले.पण यावेळी शिवराज याचे म्हणणं होतं कि माझे खांदे न टेकता पृथ्वीराज याला विजयी कसे घोषित केले यामुळे तो संतापला व त्यांने रेव्हयू दाखवा व परत कुस्ती घ्या अशी मागणी केली आहे.या वेळी पंचांच्या या निर्णयामुळे शिवराज राक्षे हा चिडला व त्यांने पंचाची काॅलर धरली व त्यांना लाथ मारली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे.पोलिसांनी यात हास्तक्षेप करुन येथील गोंधळ बाजी झाली आहे.असे सूत्रांनद्वारे ही माहिती मिळत आहे.