पुणे दिनांक २ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबई मधून खळबळजनक अपडेट आली असून.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मर्सिडीज कार चालकाने भरघाव वेगाने चालवून एकूण ५ जणांना धडक दिली आहे.जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या अपघातात दोन जण हे परदेशी नागरिक व तीन विमानतळ क्रू मेंबर यांचा समावेश आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.सदरचा मर्सिडीज कार चालक हा नवी मुंबई येथून प्रवाशांना सोडण्यासाठी विमानतळावर आला होता.दरम्यान यावेळी विमानतळाच्या गेट क्रमांक १ जवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर कार चालकांकडून चुकून एक्सीलेटर दाबला गेला यामुळे मर्सिडीज कार ही अनियंत्रित झाल्या मुळे सदरची अपघाताची घटना घडली आहे.