पुणे दिनांक २ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट अहिल्यानगर येथून आली असून.शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांचे तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना तीन वर्षे कुठल्याही स्पर्धेत खेळता येत नाही. या बाबत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी माहिती दिली आहे.पंचाला लाथ मारणे व शिविगाळ करणे हे खेळाडूंना शोभणारे नाही. तसेच अंतिम सामन्यात सोलापूरचा पहिलवान महेंद्र गायकवाड यांनी पंचांना शिविगाळ केली आहे.आता या दोघांजणांना तीन वर्षे कुस्ती खेळात भाग घेता येणार नाही.असे तडस यांनी म्हटले आहे.