पुणे दिनांक २ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट अहिल्यानगर येथून आली आहे.आज रविवारी अहिल्यानगर येथे ६७ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली होती.यावेळी शिवराज राक्षेन पंचांच्या शर्टची काॅलर ओढली व त्यांना लाथ मारली यामुळे येथील मैदानावर काहीवेळ मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता.आता शिवराज राक्षे यांच्या विरोधात पंच यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.जोप्रर्यंत राक्षे यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही तोप्रर्यंत मैदानावरुन उठणार नाही.अशी भूमिका पंचांनी घेतली आहे.दरम्यान अंतिम सामन्याच्या वेळी देखील सोलापूरचा पहिलवान महेंद्र गायकवाड यांनी हा देखील पंचांच्या अंगावर धावून गेला होता.असे देखील पंचांनी म्हटले आहे.त्यामुळे आता पहिलवान महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे या दोघांच्या विरोधात कारवाई होणार का? आणि काय कारवाई होणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.