पुणे दिनांक ४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबई वरुन एक खळबळ जनक अपडेट आली असून.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत.दरम्यान त्यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही म्हत्वाची कागदपत्रे देऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.व चार दिवसांचा आलटीमेटम दिला होता.तसेच महायुती सरकारने चार दिवसांत कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा मी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असा इशाराच अंजली दमानिया यांनी या सरकारला दिला होता.दरम्यान त्यानंतर सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही.मी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे गोळा केले आहेत.ते आज पत्रकार परिषदेत मिडिया समोर मांडणार आहेत.त्यामुळे आज दमानिया ह्या कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात काय पुरावे पत्रकार परिषद मध्ये मांडणार आहेत.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.