Home Breaking News कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे अनेक निर्णय घेण्यात आले

कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे अनेक निर्णय घेण्यात आले

31
0

पुणे दिनांक ४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महायुतीच्या सरकारची मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वा ची कॅबिनेट बैठक घेण्यात आली आहे.आज मंगळवारी झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील टेमघर प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनाची उर्वरित कामे तसेच धरण मजबुती करण्याच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.तसेच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व महाबळेश्वर येथील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या एकूण २५ प्रकल्पाला १७० कोटी रुपयांच्या तरतूदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

तसेच शेती.अक‌षिक . निवासी.वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडे पट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगावटादार वर्ग -२ च्या जमिनी भोगवटादार वर्ग -१ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.असे महत्वपूर्ण निर्णय आजच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

Previous article‘कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे मंत्री पदाच्या लायकीचे नाहीत… तातडीने राजीनामा घ्या ‘ अंजली दमानिया
Next articleपुण्यानंतर अहिल्यानगरमध्ये GBS चे ४ रुग्ण आढळले एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here