पुणे दिनांक ४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही अहिल्यानगर येथून आली असून.पुण्यात GBS च्या रुग्ण संख्यात मोठी वाढ झाली आहे.आता हा आजार पुणे जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्हा अहिल्यानगर येथे दाखल झाला आहे.दरम्यान सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर मध्ये GBSचे एकूण ४ रुग्ण आढळले आहेत.यातील अल्पवयीन मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर अन्य तीन जणांवर अहिल्या नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान या तीन जणांची प्रकृती ही ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.यातील चार जण हे ग्रामीण भागातील आहे.यातील तीनजण हे आष्टी.वाकोडी.तसेच राहुरी तालुक्यातील आहेत.अशी माहिती मिळत आहे.