पुणे दिनांक ४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी एक खळबळजनक अपडेट मुंबईवरील वर्षा बंगल्यावरुन आली आहे. वर्षा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात मोठ्या प्रमाणा वर खोदकाम करुन कामाख्या देवीच्या तेथून आणले ली रेड्याची शिंगे पुरली आहेत.अशी चर्चा असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी म्हटले आहे की.कामख्या देवीच्या मंदिरात रेडे कापल्यानंतर त्याची मंतरलेली शिंगे आणली . महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद कुणा दुसऱ्या व्यक्तीकडे टीकू नये म्हणून ती वर्षा बंगल्यावरील निवासस्थान परिसरात पुरली आहे.त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? असा खडा सवाल देखील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्या नंतर त्यांनी सागर बंगल्यावरच राहणे पसंत केले आहे.हे देखील तेवढेच खरे आहे.त्यामुळे आता राजकीय वर्तुळातून अनेक जण चर्चा करत आहेत.