पुणे दिनांक ४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट भारताची राजधानी दिल्ली येथून आली आहे.उध्दव ठाकरे गटाचे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनात संसदेत बोलून दिले नसल्याचे आता समोर आले आहे.याबाबत स्वतः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या बद्दल माहिती दिली आहे.यात त्यांनी म्हटले आहे की.’ मी काय चुकीचे बोललो? पण माझा माईक बंद केला. उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील भाविकांच्या चेंगराचेंगरीत ३० नव्हे तर त्यापेक्षाही अधिक भाविकांच्या स्नाना दरम्यान झाला आहे. फक्त एवढंच बोललो आणि सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांमध्ये गोंधळ उडाला ‘, असे त्यांनी ट्विट केले आहे.