पुणे दिनांक ५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील रेल्वे विभागाच्या वतीने मागील १० महिन्यां मधील कालावधीत रेल्वे ट्रेन तसेच लोकल मधून तिकीट न काढता फुकट मध्ये प्रवास करणाऱ्या फुकट्यांना चांगलाच दणका दिला आहे.पुणे रेल्वे विभागाने या महिन्याच्या कालावधीत पुणे.सातारा. कराड .मिरज व कोल्हापूर इत्यादी भागात विशेष मोहीम राबवून रेल्वेने फुकटात प्रवास करणारे एकूण तब्बल २ लाख ९३ हजार फुकटे प्रवासी यांना पकडले व त्यांच्या कडून एकूण १५ कोटी ८६ लाख ६९ हजार ४५० एवढा मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला आहे. दरम्यान एकंदरीत पुणे रेल्वे विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर फुकटात प्रवास करणाऱ्या फुकट्यांना चांगलाच दणका दिला आहे.असे चित्र आहे.आतातरी फुकटे रेल्वे प्रवासी सुधारतील का ?