पुणे दिनांक ५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.उत्तरप्रेदश येथील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भावीकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर तब्बल २ हजार लोक गायब आहेत.असा खळबळ जनक दावा उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.दरम्यान कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे कारणे काय आहेत? नक्की यात किती भाविक व श्रद्धाळू मरण पावले? चार दिवसांपूर्वी कच-याच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्यात आली.त्यामुळे चेंगराचेंगरीत किती लोकांचा मृत्यू झाला हे सरकारने स्पष्ट करावे ? अशी मागणीच खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान काल शिवसेना खासदार संजय राऊत यांना संसदेत या विषयावर बोलू दिले नाही.त्यांचा माईक बंद करण्यात आला असे काल स्वतः त्यांनी या बाबत ट्विट केले होते.