पुणे दिनांक ५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून ती जरा आगळी आणि वेगळी आहे.आता पर्यंत आपण मोठमोठ्या उद्योगपती किंवा शासकीय कर्मचारी तसेच राजकीय नेते यांच्या घरी पोलिसांनी 👮 धाड टाकल्या बाबत तुम्हाला माहिती असेल पण बिहार राज्यातील मुझफ्फरपूर पोलिसांनी 👮 मडवन भोज भागातील नीलम देवी या एक महिला भिकारी हिच्या घरी चक्क धाड टाकली तेव्हा तिच्या घरी चक्क विदेशी नाणी.केटीएम बाईक.एक दोन नव्हे तर चक्क १२ मोबाईल.तसेच सोन्याचे दागिने.चांदीचे अॅकलेट. तसेच ईस्ट इंडिया कंपनीचा लोगो असलेली अनेक नाणी.अशी अनेकांचे डोळे उघडणारी संपत्ती सापडली आहे.यात हे सर्व पाहून धाड टाकणा-या पोलिसांचे डोळे देखील दिपून गेले होते.दरम्यान पोलिसांना ही महिला चोरी करत असल्याची शंका आहे.तसा तिच्या वर आरोप देखील आहे.