पुणे दिनांक ५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बुधवारी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले आहे.दरम्यान मतमोजणी आधीच आता एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे.अनेक एक्झिट पोल मध्ये दिल्लीमध्ये विधानसभेच्या चाव्या ह्या भारतीय जनता पार्टीकडे जातील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर दिल्लीतील सट्टेबाजारच्या अंदाजानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला एकूण ३८ ते ४० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.भारतीय जनता पार्टीला एकूण ३० ते ३२ जागा मिळतील तर काॅग्रेस पक्षाला भोपळा दाखविण्यात आला आहे.तर या एक्झिट पोल मध्ये दिल्लीत पुन्हा तिसऱ्यांदा आम आदमी पार्टीचे सरकार येऊन हॅटट्रिक मारणार आहे.असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.