पुणे दिनांक ५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून.दिल्लीतील एकूण ७० जागांवर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.७० टक्के मतदान झाले आहे.दरम्यान या मतदानाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान हे ईशान्य दिल्ली जिल्ह्यात म्हणजेच ६३.८३ टक्के झाले आहे तर सर्वाधिक कमी मतदान हे दक्षिण पूर्व जिल्ह्यात ५३.७७ टक्के एवढे झाले आहे.
नवी दिल्ली -५४.२७ टक्के.जंगपुरा-५३.२३ टक्के. कालकाजी ५१.८१ टक्के पडपडगंज ५७.७४ ओखला- ५२.७७ बादली -६०.८८.मुस्ताफाबाद- ६६.६८.ग्रेटर कैलाश -५२ टक्के.करावलनगर- ६२.७४.शकूर बस्ती ५९ .२१ टक्के अशी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान दिल्ली मध्ये एकूण १.५६.कोटी एवढे मतदार आहेत.त्यापैकी ८३.७६ लाख पुरुष मतदार आहेत.तर ७२.३६ टक्के महिला मतदार आहेत.तसेच १ हजार २६७ तृतीयपंथी मतदार आहेत. तसेच अपंगांसाठी घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.