पुणे दिनांक ५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एकूण ६० ते ७० वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.यावेळी हातात कोयता घेऊन या भागात दहशत माजवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हातात कोयता घेऊन या वाहनांची तोडफोड केली आहे
दरम्यान या गंभीर प्रकरणाबाबत पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 तातडीने दखल घेतली आहे.या तोडफोड प्रकरणी तीन संशयितांची ओळख देखील पटवण्यात आली आहे.दरम्यान सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी भागात राहणाऱ्या लोकांनी त्यांची वाहने घराबाहेर लावली असताना अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास ही तोडफोड केली आहे. सदर तोडफोड प्रकरणी स्थानिक पोलिसांनी 👮 काही जणांना ताब्यात घेतले होते.व नंतर सोडून दिले असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.त्यांनी या प्रकरणी पोलिसांच्या या कारवाई बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.दरम्यान वाहनांच्या तोडफोडी नंतर या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.व पोलिस यातील गुन्हेगारांवर कारवाई करत नसल्याने बिबवेवाडीतील नागरिक त्रस्त झाले आहेत.दरम्यान पुण्यात येरवडा. कोंढवा.पर्वती तसेच आता बिबवेवाडी.या भागात तोडफोड सुरूच आहे.वाहनांच्या तोडफोडीला आता पुणेकर नागरिक हे त्रस्त झाले आहेत.आता पुणे पोलिसांनी 👮 वाहनांची तोडफोड करणाऱ्या अज्ञातां च्या विरोधात कठोर कारवाई करावी अन्यथा हे सत्र सुरूच राहणार आहे.असे अनेक नागरिकांचे या तोडफोड बाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.