पुणे दिनांक ५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दोन दिवसांपूर्वी शिर्डीतील दुहेरी हत्याकांडा नंतर साई संस्थानच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान शिर्डी संस्थानाच्या वतीने मोफत सुरू असलेल्या अन्न छत्रालायात जेवणासाठी कूपन घ्यावे लागणार आहे.कूपन असेल तरच जेवण मिळणार आहे.दरम्यान यापूर्वी शिर्डीतील प्रसादालयात मोफत जेवणासाठी थेट प्रवेश देण्यात येत होता.पण आता उद्या पासून कूपन बंधनकारक करण्यात आले आहे.सदरचे कूपन मोफत मिळणार आहे.यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही.
दरम्यान हे कूपन शिर्डी येथील संस्थानच्या प्रसादलातील जेवणासाठी त्याच ठिकाणी हे कूपन मोफत उपलब्ध केले जाणार आहेत.दरम्यान त्याच सोबत साई संस्थानच्या भक्त निवासात देखील हे कूपन देण्यात येणार आहे.कूपन घेतल्या नंतरच भाविकांना प्रसादाचा आनंद घेता येणार आहे.असा नियम गुरुवारी दिनांक ६ फेब्रुवारी पासून लागू करण्यात आला आहे.असे शिर्डी संस्थानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.