पुणे दिनांक ६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करूणा शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती. असा खळबळजनक आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.माझ्यावर खुप अत्याचार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत.त्यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त आहे.असे देखील करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.दरम्यान आज मुंबईमधील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने आज घरगुती हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले आहे.तसेच त्यांनी करुणा यांना दर महिन्याला १ लाख २५ हजार रुपये तसेच मुलीला ७५ हजार रुपये पोटगी द्यावी असे आदेश दिला आहे.