पुणे दिनांक ७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.आता इंडिया आघाडीच्या वतीने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे.तसेच ईव्हीएमच्या विरोधात १९ फेब्रुवारीला मारकडवाडीते शिवाजी पार्क असा पायी लाॅंग मार्च काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे .शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे तसेच काॅग्रेस पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत.तर शिवाजी पार्कवर काॅग्रेस पक्षाचे खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी तर जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेनेचे उध्दव ठाकरे आदी मान्यवर नेते मंडळी सहभागी होणार आहेत .दरम्यान याच संदर्भात आज दिल्लीत काँग्रेस पक्षाचे खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे.तसेच उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत.यांनी ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली आहे.व महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केला आहे.