पुणे दिनांक ७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून पुण्यात GBS आजाराचे थैमान सुरूच आहे.दरम्यान पुण्यातून सुरू झालेल्या या आजाराने आता संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे.तसेच या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.दरम्यान या आजाराने आज पुण्यात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथील वडारवस्ती येथील ६४ वर्षीय रुग्णांवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे आतापर्यंत पुण्यातील मृतांचा आकडा हा सहा झाला आहे.तर अजून तीन रुग्णांची वाढ झाली आहे.