पुणे दिनांक ७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सकाळीच हाती मुंबई मधून एक खळबळ जनक अपडेट आली आहे.मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान सदर आगीबाबत अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे.दरम्यान शाॅटसर्किटमुळे आमदार निवासातील रुम नंबर ३१३ ला ही आग लागली होती. त्यानंतर ती पसरत गेली.दरम्यान आता संपूर्णपणे आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले आहे.त्यामुळे आमदार निवास मधील मोठा अनर्थ टळला आहे.