पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.पुणे जिल्ह्यातील देहूगाव येथील हभप शिरिष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता त्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आर्थिक मदत करणार आहेत.त्यांनी ३२ लाख रुपये शिवसेना नेते व पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान आमदार शिवतारे हे देहू येथे जाऊन मोरे कुटुंबीयांची भेट घेऊन ही आर्थिक मदत त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.दरम्यान आत्महत्या करणारे शिरिष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते