पुणे दिनांक ९ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट छत्तीसगड येथून आली आहे.छत्तीसगडमधील बिजापूर मध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.या झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत.तर २ जवान शहीद झाले असून आणखी दोन जवान हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.छत्तीसगड येथील बिलासपूर येथील राष्ट्रीय उद्यान परिसरात अजून देखील चकमक सुरू आहे. दरम्यान नक्षलवादी व जवान यांच्यात दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे.बस्तरचे आयजी सुंदरराज पी या चकमकीबाबत पुष्टी दिली आहे.मार्च २०२६ प्रर्यंत छत्तीसगड नक्षल मुक करण्याचे लक्ष राज्य सरकारच्या वतीने ठेवण्यात आले आहे.