Home Breaking News महाराष्ट्रात ठाकरेंच्या दैनिक सामनाला शिंदेचे दैनिक धर्मवीर देणार सडेतोड उत्तर

महाराष्ट्रात ठाकरेंच्या दैनिक सामनाला शिंदेचे दैनिक धर्मवीर देणार सडेतोड उत्तर

52
0

पुणे दिनांक ९ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता मुंबईतून सकाळीच एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून. महाराष्ट्रात आता शिवसेनाचे दोन दैनिक मराठी वर्तमानपत्रे असणार आहेत.आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ६२ वा वाढदिवस आहे.शिंदे हे वाढदिवसाचे औचित्य साधत आज रविवारी शिवसेनाचे मुखपत्र म्हणून दैनिक ‘धर्मवीर’ ची स्थापना मोठ्या धुमधडाक्यात सुरू होणार आहे.दरम्यान या बाबतची माहिती अध्यामिक आघाडीचे प्रमुख अक्षय महाराज यांनी दिली आहे.त्यामुळे आता महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांच्या दैनिक सामनाला एकनाथ शिंदे यांचे नवीन दैनिक धर्मवीर हे सडेतोड उत्तर देणार आहे. या पुढे दैनिक ‘सामना’ तून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला व तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या टिकेला मराठी दैनिक ‘धर्मवीर’ मधून सडेतोड प्रत्यूत्तर देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान आज रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ६२वा वाढदिवस आहे.व याचेच औचित्य साधून आज दैनिक धर्मवीर या मराठी वर्तमानपत्राची मुहूर्तमेढ होत आहे.त्यामुळे आजपासून पुढे दैनिक ‘सामना’विरुद्ध दैनिक ‘धर्मवीर’ असे चित्र महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे.

Previous articleदिल्लीत कमळ फुलणार की झाडू चालणार थोड्याच वेळात होणार स्पष्ट
Next articleमहायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ६२वा वाढदिवस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here