पुणे दिनांक ९ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय शिक्षण कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून येत आहे.कोल्हापुरातील हातकणंगले येथे काही बोगस डॉक्टरांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आता याबाबत एक बोगस डॉक्टराचे प्रकरण समोर आले आहे.या बोगस डॉक्टर मुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील बोगस डॉक्टराने बारावीनंतर कोल्हापुरातील औद्योगिक वसाहती मधील एका कंपनीत काम केले आहे.दरम्यान कोरोना कालावधीत त्याची नौकरी गेल्यामुळे तो रुग्णालयात काम करत होता.त्यानंतर त्यांने स्वतः प्रॅक्टिस सुरू केली आणि नागरिकांवर उपचार करु लागला.अशी माहिती मिळत आहे.