पुणे दिनांक १० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे.त्यामुळे आता नाराजी नाट्य नंतर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विषेश करून मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान मुंबई महानगरपालिका मध्ये निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही जागा सोडून सोबत घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टी अशी राजकीय खेळी करुन एका दगडात दोन 🐦 पक्षी नव्हे तर तीन राजकीय पक्षांना घायाळ करणार यात मात्र तिळमात्र शंका नाही.