पुणे दिनांक १० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा ऋषिकेश सावंत यांचे अपहरण झाले नसल्याचे समोर आले आहे.अशी माहिती पुणे पोलिस व स्वतः तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.दरम्यान पत्रकार परिषद मध्ये बोलताना तानाजी सावंत म्हणाले की ऋषिकेश सावंत हा बेपत्ता नसून तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला आहे.पण तो कुठे आहे.याची माहिती नाही.दरम्यान तो पुणे एयरपोर्ट वरुन प्लेनने गेला आहे.अशी माहिती त्यांच्या ड्रायव्हर यांनी दिली आहे.
दरम्यान सर्वच माध्यमांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले अशा न्यूज दिल्याने पोलिसांनी 👮 तातडीने तपास सुरू केला आहे.दरम्यान माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुणे पोलिस आयुक्त कार्यालयत दाखल झाले आहेत.दरम्यान पुणे पोलिसां बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी व पोलिसांनी 👮 संयुक्त रित्या पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संपर्क साधला आहे.दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की.ऋषिराज सावंत बेपत्ता नाही.व त्याचे अपहरण झालेले नाही.तो त्याच्या मित्रांसोबत आहे.पण नेमका कुठे आहे.याची माहिती नाही.दरम्यान या आधी तो कुठे जायचे असेल तर मला सांगतो मात्र आज त्याने त्याची गाडी वापरली नाही.तो दुसऱ्या गाडीतून गेला आहे.त्यामुळे मी काॅन्शस झालो व अचानक तो एअरपोर्टवर कसा गेला.म्हणून मी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला.पण आता कळलं की तो पुणे एयरपोर्ट वरुन प्लेनने गेला अशी माहिती त्याच्या चालकाने दिली आहे.तसेच या संदर्भात पुणे पोलिस व आम्ही अधिकची माहिती घेत अहोत.अशी त्यांनी माहिती दिली आहे.दरम्यान ऋषिकेश सावंत यांचे अपहरण झाल्याची माहिती पुणे पोलिस कंट्रोल रुमला आली होती.