पुणे दिनांक १० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट उत्तरप्रदेश येथील प्रयागराज मधील कुंभमेळ्यातून येत आहे.सध्या प्रयागराज मध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.इथे अक्षरशः वाहनांच्या ३०० किलो मीटर प्रर्यत रांगाच रांगा लागल्या आहेत.आता याचा सोशल मीडियावर याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ज्यात त्या व्यक्तीने तेथील भयानक परिस्थिती सांगितली आहे.भाविकांना प्यायला पाणी व खायला अन्न वेळेवर मिळत नाही. तसेच अक्षरशः भाविक गाडीतून उतरून खाली रस्त्यावर बसत आहेत.तर मागील १२ ते १५ तासांपेक्षा भाविक एकाच जागी अडकल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान उत्तरप्रदेश मधील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.या वाहतूक कोंडींचा त्रास भाविकांना सहन 🐻 करावा लागत आहे.संपूर्ण भारतातून तसेच बाहेरील देशांमधून मोठ्या संख्येने नागरिक महाकुंभ मेळाव्या साठी येत आहेत.दरम्यान येथील प्रयागराज प्रशासना च्या वतीने दिनांक १५ फेब्रुवारी पर्यंत प्रयागराजला न येण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान येथे वाहतूक कोंडी मध्ये अडकलेल्या एका भाविकांने माध्यमांना बोलताना सांगितले की.आम्ही मागील तीन दिवसां पासून बसमध्ये अडकलो आहे.येथील एका व्यक्तीने आम्हाला मदत केल्यामुळे त्यांना जेवण व पाण्याची व्यवस्था झाली.अशी भयावह अवस्था सध्या तिथे पाहायला मिळत आहे.उत्तरप्रदेश मधील योगी सरकारने महाकुंभ मेळाव्याचे व्यवस्थीत नियोजन न केल्यामुळे अनेक भाविकांना त्याचा फटका बसत आहे.असे अनेक भाविक हे बोलत आहेत.तसेच उत्तर प्रदेश सरकार फक्त आकडेवारी जाहीर करत आहे की आतापर्यंत ४१ करोड भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे.