पुणे दिनांक १० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून येत आहे.भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सोमवारी सकाळी प्रयागराज येथे दाखल होत आज त्यांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे.दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बरोबर यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपाल आनंदीबेन पटेल या देखील उपस्थित होत्या.दरम्यान प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू झाल्या पासून आतापर्यंत या महाकुंभमेळाव्यात एकूण ४१ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे.तर काहीच दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे.