पुणे दिनांक १० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून राजकीय क्षेत्रातून खळबळजनक अपडेट हाती आली आहे. महाराष्ट्राचे शिवसेनेचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे येथील एयरपोर्टवरुन गायब झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.दरम्यान सदर घटनेबाबत पुणे 👮 पोलिस कंट्रोल रुममध्ये काॅल आला होता.याबाबत माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पोलिस यंत्रणेला विचारणा सुरू आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी दुपारी ड्रायव्हरला पुणे एयरपोर्टवर सोडायला सांगितले होते.त्यानंतर मुलगा गायब झाल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान तातडीने माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुणे एयरपोर्टवर दाखल झाले आहेत.