पुणे दिनांक १२ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बुधवार माघी पौर्णिमेच्या निमित्ताने आज उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात त्रिवेणी संगमावर पाचव्या स्नाना च्या निमित्ताने आज पहाटे साडेतीन वाजण्यापासून भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे तसेच आज ब्रम्ह्य मुहूर्तापासून संगमावर गर्दी जमली आहे गंगा, यमुना.आणि अदृष्य सरस्वतीच्या संगमावर भाविक मोठ्या श्रध्देने स्नान करत आहेत.दरम्यान उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने आतापर्यंत तब्बल ४६.२५ करोड भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे.दरम्यान आज माघी पौर्णिमेच्या निमित्ताने दोन कोटी पेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे.दरम्यान आज माघी पौर्णिमा असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार हे लक्षात घेऊन. प्रशासनाच्या वतीने अक्षय वट आणि लेथ हनुमान मंदिर बंद करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.