पुणे दिनांक १२ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही महाराष्ट्राचा मिनी बिहार अर्थात बीड जिल्ह्यातून आली असून.काहीच दिवसांपूर्वी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत एका उमेदवारांच्या बाॅडीगार्ड यांना रोखल्या प्रकरणी तसेच अन्य पक्षांच्या कार्यकर्त्य यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फडवर आज अखेर परळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे तब्बल ८२ दिवस झोपलेल्या परळीच्या पोलिसांनी 👮 आता त्यांना जाग आल्यावर फडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान आता परळी पोलिसांनी कैलास फड तसेच त्यांचा दिवट्या मुलगा आणि इतर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीत मारहाणीच्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊन देखील मुंडे यांच्या दबावाखाली परळी पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला नव्हता.यावर अनेक राजकीय पक्षांनी पोलिसांच्या नाकर्तेपणावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी केली होती.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील टीका टिप्पणी केली होती.