Home राजकीय उध्दव ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

    उध्दव ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

    56
    0

    पुणे दिनांक १३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही राजकीय वर्तुळातून आली असून.माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाचे माजी आमदार व उपनेते राजन साळवी हे आज गुरुवारी माजी मुख्यमंत्री तथा आता महायुतीत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान काल बुधवारी राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.त्यानंतर काल त्यांनी  ठाणे येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली व आज ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.दरम्यान मागील वर्षांपासून राजन साळवी यांच्या मागे एसीबी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. दरम्यान राजन साळवी हे माजी आमदार असून ते कोकणातील नेते आहेत.त्यांच्या आजच्या पक्ष प्रवेशा मुळे कोकणात उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.दरम्यान यापूर्वी राजन साळवी हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती.पण त्यांनी आज उध्दव ठाकरे यांना जयमहाराष्ट्र करत शिंदे यांच्या गटात डेरेदाखल होत आहेत.

    Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस
    Next articleकाॅग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here