पुणे दिनांक १३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार राज्यात GBS या आजाराची रुग्णसंख्या आता २०० च्या पुढे गेली आहे.या आजाराने महाराष्ट्रात थैमान घातले आहे.दिवसांदिवस या रुग्ण संख्यात मोठी वाढ होताना दिसत आहे.दरम्यान राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार आता राज्यात एकूण GBS या आजाराचे एकूण रुग्ण संख्या ही २०३ झालेली आहे. यातील १७६ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यापैकी ५२ रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत तर .२० रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.दरम्यान GBS अर्थात गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांची संख्या आता २००च्या पार झालेली आहे.त्यामुळे आता महाराष्ट्रातील लोकांनी याची काळजी घ्यावी.असे महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.आताप्रर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आठव्या रुग्णाचा मृत्यू हा मुंबईत झाला आहे.त्यामुळे आता या आजाराचे रुग्ण महाराष्ट्राची राजधानी मुंबईत देखील दाखल झाले आहेत.त्यामुळे या आजाराची महाराष्ट्रात झपाट्याने वाढ होत आहे. असे एकंदरीत चित्र स्पष्ट होत आहे.