पुणे दिनांक १३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.दरम्यान करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार आता निवडणूक शपथ पत्रात दिलेल्या माहितीनुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.बीड जिल्ह्यातील परळी फौजदारी न्यायालयाच्या वतीने ही नोटीस बजावण्यात आली आहे.शपथपत्रात करुणा मुंडे यांच्या नावाने असलेली मालमत्ता न दाखवल्या मुळे ही सदरची नोटीस बजावण्यात आली आहे.तर आता दिवसेंदिवस धनंजय मुंडे यांच्या पाय आणखी खोलात जात असल्याचे पहायला मिळत आहे.