Home क्राईम देहूरोड येथे वाढदिवसाच्या पार्टीत अंधाधुंद गोळीबार, एकाचा घटनास्थळी मृत्यू तर दोनजण गंभीर...

    देहूरोड येथे वाढदिवसाच्या पार्टीत अंधाधुंद गोळीबार, एकाचा घटनास्थळी मृत्यू तर दोनजण गंभीर रित्या जखमी

    159
    0

    पिंपरी -चिंचवड १४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.देहूरोड येथे वाढदिवसाच्या पार्टीत एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे.या गोळीबारात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोनजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान पुर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाला आहे.अशी माहिती मिळत आहे.

    दरम्यान या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार देहूरोड येथील गांधीनगर येथील वाढ दिवसाच्या पार्टीत जुन्या भांडणाच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला आहे.या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव  विक्रम गुरुस्वामी रेड्डी आहे . उपचारासाठी देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पण उपचारा दरम्यान त्यांच्या मृत्यू झाला आहे.तर यातील नंदकुमार यादव यांच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या आहेत.दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी 👮 यातील फरार आरोपींच्या शोधाकरीता पोलिस पथक रवाना केले आहे.या गोळीबार प्रकरणी पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहेत.

    Previous articleपुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा
    Next articleएमपी मधील प्रियांका कदम म्हणजे दुसरी पूजा खेडकरच?

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here