पुणे दिनांक १४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी 👮 या खूना प्रकरणी एकूण २१ आरोपींना अटक करून त्यांच्या वर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.यात बहीण व भाऊ यांच्यात प्राॅपर्टीवरुन वाद सुरू होता.यातूनच अन्य आरोपींच्या मदतीने वनराज आंदेकर यांची गोळ्या घालून खून करण्यात आला होता.दरम्यान पुणे पोलिसांनी या खूनप्रकरणी तपास करुन पुणे येथील न्यायालयात आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे.
दरम्यान यातील आरोपी व वनराजची बहिण संजिवनी कोमकर यांचे नानापेठ येथील जनरल स्टोअर्सच्या दुकानांवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सदरची अतिक्रमण कारवाई ही माजी नगर सेवक वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरून झाली असा संशय होता.तसेच संजिवनी कोमकर.जयंत कोमकर.गणेश कोमकर.प्रकाश कोमकर.यांचा वनराज आंदेकर यांच्या कुटुंबीयांसमवेत वाद सुरू होता.त्याचा आरोपी संजिवनी कोमकर.जयंत कोमकर गणेश कोमकर.प्रकाश कोमकर यांना राग होता.तसेच २०२३ मध्ये आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर व इतर यांनी गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड.यांच्या टोळीतील सदस्य निखिल आखाडे याचा खून केला होता.वरील दोन्ही कारणावरून टोळी प्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड.व संजिवनी कोमकर.जयंत कोमकर.गणेश कोमकर.प्रकाश कोमकर यांनी इतर आरोपींसह माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट रचला व १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सोमनाथ सयाजी गायकवाड यांच्या टोळी मधील सदस्य आकाश म्हस्के.विवेक कदम.तुषार कदम.समीर काळे.यांनी त्यांच्या कडील अवैध पिस्तूल मधून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या वर फायर करुन त्यांना जखमी करून खून केला.व इतर ९ आरोपी यांनी कोयत्याने आंदेकर यांच्या हल्ला केला होता.याताच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान या गुन्ह्यात आरोपी यांनी वापरलेले एकूण ८ पिस्तूल १३ जिवंत काडतुसे व ७ कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात आरोपी यांनी वापरलेल्या ७ दुचाकी व ३ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.व या गुन्ह्यात एकूण ३९ साक्षीदार तपासण्यात आले आहे. या गुन्ह्यात एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसेच आज शुक्रवारी पुणे येथील न्यायालयात एकूण १ हजार ७०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या गुन्ह्यात दोषारोप मधील महत्वपूर्ण मुद्दे याप्रमाणे आहे.१) सी सीटीव्ही फुटेज.नानापेठ.आंबेगाव पठार.दापोली रत्नागिरी.आरोपींचे आवाजाचे नमुने.मकोका कलम १८ चा जबाब व कार्यवाही.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १८३ प्रमाणे जबाब.कार्यवाही.तसेच आरोपींची ओळख परेड कार्यवाही.आरोपीत यांचे मोबाईल वरून एकमेकांशी झालेला संपर्काबाबत तांत्रिक विश्लेषण.आरोपींचे पुर्वीचे गुन्हे रेकॉर्ड. संदर्भ कारवाई.तसेच गोपीनिय साक्षीदारांकडे तपास व कार्यवाही.तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे तपास कार्यवाही.तसेच आरोपीत यांचे संघटित गुन्हेगारी टोळीचे स्थावर.व जंगम.मालमत्तेबाबतची कायदेशीर कारवाई.गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल.तसेच पुरवठा करणारे परराज्यातील आरोपी बाबत तपास.कार्यवाही तसेच आरोपी यांना गुन्ह्यात मदत करणारे याबाबत तपास कारवाई करुन पुरवणी दोषारोपपत्र पाठविण्या ची तजवीज ठेवली आहे.